सोन्याचं पाऊस पडणारे गाव | Sonyacha Paus pdnare gao | Beed | Beed Kolhapur | Historical Village

Published 2020-11-07
कलेश्वर मंदिर कसबा बीड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे. कोल्हापूरमध्ये शिलाहार राजा भोज या राज्याची राजधानी असणारे पन्हाळा व नंतर बीड या ठिकाणचे इतिहास बरंच काही सांगून जाते.
कसबा बीड या ठिकाणी आपण या मंदिराला भेट दिली आणि याच भागात सोन्याचा पाऊस पडतो म्हणून अशा चर्चा होतात.तर सोन्याचा पाऊस पडते म्हणजे या प्रत्यक्षात या गावांमध्ये ज्यावेळेस नगरप्रदक्षिणा असते पुर्वी त्यावेळी राजांनी राजमुद्रा उधळलेले असते जनतेला ते दान म्हणून दिले असते किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये ह्या उधळले असतात फुलाप्रमाणे वर्षाव केलेले असतात त्यामुळे त्या सोन्याच्या मुद्रा अनेक भागांमध्ये विखुरल्या गेलेल्या त्या आज कुठे तरी सापडत असतात कोणाच्या घरावर कोणाच्या शेतामध्ये तर कोणाच्या अनेक ठिकाणी हे आजही राजमुद्रा सापडत असतात सोन्याचे नाणे सापडत असतात म्हणून या गावाला सोन्याचा पाऊस पडणारे गाव असे म्हणतात.
या गावावर कोण्या एका राज्याची सत्ता होती हे निश्चित सांगता येत नाही परंतु अनेक स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे याठिकाणी शिलाहार राजा गोंक इसवीसन १०२० ते १०५० सम्राट जयसिंग १०२५ते १०४२त्याचा समकालीन होता आणि जयसिंगाला दक्षिण कोकण जिंकण्यास साहाय्य केले असावे नंतर जयसिंह कडून तो परदेशी मिळवला असावा म्हणून आहे ना या ठिकाणी बल्लाळ गंडारादित्य शिलाहार राजे गादीवर आले होते त्यांचे काळामध्ये यांचा उल्लेख आढळून येतो त्यानंतर खुद्द बीड येथील श्री राजाराम वरुटे यांच्या शेतात असलेल्या शिलालेखात येतो यावरून असे लक्षात येते की जयसिंहाने वर उल्लेख केलेले प्रदेश जिंकून घेतल्यापासून त्यांच्या बऱ्याचशा भागावर कोल्हापूरचे शिलाहार राजांची सत्ता होती आणि हे शिलाहार राजे चालुक्यांचे मांडलिक म्हणून राज्य कारभार पाहत होते.
मंदिरात प्रवेश करताच अनेक प्रकारचे वस्तू आणि कोरलेले शिलालेख असे दिसून येतात त्याला वीरगळ असे म्हणतात.थोडक्यात वीरगळ म्हणजे काय तरी एखाद्या सैनिकाचे एखाद्या युद्धामध्ये प्राण्याच्या हल्ल्यामध्ये अनेक कारणांनी मृत्यू झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ ठेवलेले शिलालेख व स्मारक म्हणजेच वीरगळ होय.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर दगडी जुन्या बांधकामांमध्ये मंदिर दिसते अतिशय सुंदर अशा काम केलेले आहे दगडामध्ये बांधकाम केलेले मंदिर असून मंदिरात कलेश्वर देवाची खू सुंदर मूर्ती आहे आणि मंदिरात काही स्तंभ दिसतात पिलर दिसतात त्याच्या समोर आल्यानंतर एक दीपस्तंभ दिसते ज्योत लावण्यासाठी कोल्हापुरातील असे अनेक मंदिरांमध्ये दिपस्तंभ असतात.
या ठिकाणी उत्खननात अनेक असे वस्तू सापडले त्यामध्ये तांबूस रंगाचे खापरे मातीच्या भांड्यांचे तुकडे मनी काचेच्या बांगड्या सोन्याची नाणी अशी वस्तू या ठिकाणी सापडले मी काहीतरी मोठे हंडे अशा प्रकारची भांडी पण सापडलेले या भागांमध्ये कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथील उत्खननात अशा प्रकारची ही भांड्यात घेऊन आली होती. आणि बीड येथील हा जयसिंग राजा ने कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथे किल्ला बांधला होता.

महत्वाची सुचना.
हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तू जनतेसमोर आणणे व पर्यटन स्थळांना चालना देणे आणि लोकांना याचे ज्ञान देणे परंतु काही गोष्टी येथे माहितीमध्ये तारखा असो राजांची सत्ता असो ह्या गोष्टी निश्चित आम्ही सांगू शकत नाही कारण बर्याच अभ्यासकांचा मध्ये काही तफावत आढळून येतात काही वेगळे दिसते तर काही पुस्तकांमध्ये काही गाईडचे सांगणे वेगळे असते . त्यामुळे आम्ही याची खात्री सांगू शकत नाही थोडेफार इकडेतिकडे ज्ञान घेऊन वाचलेला असून इंटरनेटवरून माहिती काढून ही माहिती दिलेली आहे आणि ही अधिकृत माहिती अशी नाही त्यामुळे याच्यामध्ये जबाबदार आम्ही नसणार आहे.

All Comments (21)
  • 1नंबर 👌व्हिडिओ युट्यूब व्हिडिओज ला लाईक का करायचे? लाईक आणि कमेंट मुळे youtub ला हे कळते कि हा व्हिडिओ वैयक्तिकरित्या किती लोकांना आवडला आणि त्याला प्रतिसाद कसा आहे जर हे जास्त प्रमाणात असेल तर youtub आपला व्हिडीओ इतर लोकांना सुद्धा SUGGEST करते आणि इतर लोक सुद्धा आपले व्हिडीओज बघतात आपली ज्ञानेश्वर अस्वले फॅमिली अजून खूप मोठी व्हावी असे ज्यांना वाटते तयांनी व्हिडीओज ला लाईक &कमेंट्स करा कारण बऱ्याच जणांना व्हिडीओ आवडतात पण तयांना लाईक चे महत्व माहित नसते त्या मुळे ही खास कमेंट 🙏आपला माणूस प्रामाणिक पणे लई मेहनत घेतो आहे त्याला सपोर्ट करा ही नम्र 🙏🙏विनंती 🙏
  • @BT-uh7se
    khup mst sangital ....suvarn kolhapur
  • खूप चांगली माहिती. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Wha dada great share,superb explaination, wonderful uplode dada, yeu kadhi tari baghnaya sathi, big thumbsup for great job dada
  • @vidhyashinde01
    खूप छान दर्शन दिले देवाचे आणि माहिती पण छान